Wednesday, 25 September 2013
Saturday, 14 September 2013
गणेशत्सवातील सांस्कृतीक कार्यक्रम
सार्वजनिक गणेश उत्सव किंवा सोसायटीतील गणेशत्सव असला म्हणजे तिथे 5 ते 6 बिल्डींग मिळून गणेशाच्या मूतीची स्थापना केली जाते. त्यातील काही मोजके सदस्य ह्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. गणेशाच्या मूर्तीची सजावट ते विविध कार्यक्रमाचे आयोजन या सर्वीची जबाबदारी त्याच्यावर असते.
साधारण छोट्या सोसायटी असेल तर 5 ते 6 दिवसाचा गणेशत्सव असतो. त्यातील वेशभूष स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध खेळ व महत्त्वाचा म्हणजे नृत्याचा कार्यक्रम असा साधारण सभारंभ असतो. त्यात भाग घेणा-याची संख्या वय वर्षे 2 ते अगदी 35-40 वयातील सर्वसदस्य आनंदाने भाग घेतात आपल्या कलागुणानां वाव मिळवा त्याच कौतुक व्हाव किंवा अगदीच हौस म्हणूनही सामिल होणारे हैसी कलाकार असतात. यातला सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे “डान्स” सर्वांना सोसायटीतल्या मैदानात किंवा गणेशत्सवासाठी बांधण्यात आलेल्या स्टेज जवळ खिळवून ठेवणारा असतो. त्यात सर्वात प्रथम लहान मुलांचा डान्स अधि ठेवला जातो. छोट्या शिशूला जाणारे ते अगदीच पेलग्रुप मध्ये जाणारे हे चिमुकले त्यांना सादर करण्याच्या गाण्यावर त्यानुसार ड्रेस घालून येतात. लाल लाल लिपस्पिटिक लावून गालाला भरपूर पावडर लावून किंवा छानस फाऊडेशन लावून आपला डान्स करतात कोणी फक्त कंबर हलवत तर कोणी फक्त आपले हात व पाय हलवत डान्स करत बाकी सर्व ठप्प असत. माझा मुलगा किंवा माझी मुलगी स्टेजवर डान्स करते हे पाहून त्यांच्या घरातील मम्मी-पप्पा सर्व खूश होतात. त्या लहान मूलांना ते गाण समजतही नसत तरी ते ताल धरून नाचताना खरचं अनोळखी लोकांनाही त्याचा हेवा वाटतो. आपल्याला छान प्रतिसाद मिळतो, सर्व खूश होतात टाळ्या वाजवतात म्हणून ही मूल अजून जोरात डान्स करतात. गाण संपल की त्यांच कौतुक करणारे भरपूर असतात. कोणी पैसे देत तर कोणी “वन्स मोर” पुन्हा डान्स करण्यास सांगत वेळेच भान ठेऊनच कार्यक्रम उरकायचा असतो. म्हणून आयोजक पुढचा डान्स सुरू करायला सांगतो. त्यात वय वर्षे 12 ते 14 यातली मूलं जी रोज फक्त शाळेतच जाताना दिसतात ही मूल कधी डान्स करत असतील अस वाटतही नाही त्यातला मग एखादा अनिल कपूर होऊन “एक दोन तीन चार” चा डान्स कारतो. तर एखादा लगेच गोंविदा बनतो तर तिसरा अचानक प्रक्षेकांमधून उठून सलमान खान सारखा “ओ ओ जनाने जाना धुडे तुझे दिवाना” या गाण्यावर अंगातला शर्ट काढून डान्स करत स्टेज वर येतो. आपल्या सोसायटीतील हा आताच मोठा झालेला मुलगा इतका छान डान्स करताना पाहून सर्वाच जण अगदीच चकित होतात. मग जोरदार टाळ्यात त्याचे स्वागत त्यांचा डान्ससाठी जोरदार शिट्या वाजवल्या जातात तसच एखादी त्याच वयातील मुलगी जेव्हा साडी घालून डान्स करते तेव्हा “अरे ही इतकी सुदंर दिसते” ह्या पासून तिने केलेल्या डान्सच कौतुक केल जात जर डान्स छान झाला तर गणेशत्सव संपल्यावरही ती मुलगी किंवा मुलगा कुठेही भेटला तरी ओळखता येतो.
या कार्यक्रमात महिलाही मागे नसतात. रोज घरातील काम करणारी किंवा रोज सकाळी 9 ते 6 पर्यत ऑफिसला जाणरी काकी, मावशी मिळून जेव्हा एखादा डान्स करतात वेळात वेळ काढून हैस म्हणून त्या तयार होतात. “पण मला तर नाचताच येत नाही मग मी कशी करू” डान्स यावर बाकीच्या बायकांच उत्तर असत “आहो, काकू तुम्ही फक्त उभ्या रहा येईल हो आम्हाला तरी कुठे येतो चांगला डान्स पण एक गमंत म्हणून रोज सर्वजण भेटत तर जाऊ”. ज्या दिवशी डान्स त्या दिवशी तर अगदी घरातली सर्व कामे उरकवून नीट तयारी करून स्टोजवर जेव्हा या सा-याजणी उभ्या राहतात तेव्हा खाली उभे असलेले त्याचे नवरे व घरातली मंडळी आधी फक्त मजेशीर हसतात नंतर अरे खरच आपली बायको किंवा त्याची मुल आई आपली खरंच डान्स करते बघून आनंदी होतात.
या कार्यक्रमात कोणतीही स्पर्धा नसते पण एक उत्साह म्हृणून सर्व आनंदाने भाग घेतात आपल कौतुक करून घेतात. सर्वाना एकत्र आणणारा हा गणेशत्सव खरचं रोजच्या दगदगीच्या जीवनाला एक स्थैर्य देऊन जातो. पुन्हा नव्याने काम करण्याचा एक उत्साह ताकत देऊन जातो. म्हणूनच आपण “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या “ अस सारेजण अवर्जन गणेशाला लवकर येण्याचा आग्रह करतात.
Subscribe to:
Posts (Atom)